सार्वजनिक जीवन
जगाला याची माहिती देणे
एकदा त्यांची मुले मोठी होऊन स्थिरावली की, निर्मला श्रीवास्तव सार्वजनिक क्षेत्रात अधिक लक्ष आणि वेळ गुंतवू शकल्या. त्यांचे पती लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे प्रमुख असताना, त्यांनी तिथे एका छोट्या गटासोबत आपले अध्यात्मिक कार्य सुरू केले. त्यांनी देशाचा दौरा करण्यासही सुरुवात केली, व्याख्याने दिली तसेच आत्मसाक्षात्काराचा अनुभव दिला. लवकरच निर्मला यांना श्री माताजी या सन्मानार्थ पदवीने ओळखले जाऊ लागले, ज्याचा अर्थ 'आदरनीय आई,' कारण त्यांच्या आसपासच्या लोकांनी त्यांच्या असाधारण आध्यात्मिक आणि आईसमान गुणांचा स्वीकार केला.
त्यांनी कधीही या व्याख्यानांसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी पैसे आकारले नाहीत. सर्व मानवांमध्ये सुप्त असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेची जागरूकता हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आणि त्यामुळे यासाठी पैसे घेऊ नयेत असे त्यांनी मानले. श्री माताजींनी विकसित केलेल्या आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून ध्यान करण्याच्या पद्धतीला सहज योग असे म्हणतात. सुरुवातीला त्यांनी आपले प्रयत्न युनायटेड किंगडममध्ये केंद्रित केले आणि छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंतच्या श्रोत्यांसमोर आपला संदेश पोहोचवला. त्यांनी देशभर प्रवास केला, रेडिओ आणि टेलिव्हिजन मुलाखती दिल्या, सार्वजनिक हॉलमध्ये व्याख्याने घेतली आणि श्रोत्यांमधील व्यक्तींशी भेटून त्यांचे अनुभव आणि समस्या ऐकून त्यांना सल्ला देण्यात तासनतास घालवले.
हे १९८० च्या दशकात घडले होते जेव्हा श्री माताजींनी युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका दौरा सुरू केला. ज्या सर्वांना स्वारस्य होते अशांना सहज योग विनामूल्य शिकवला आणि आधुनिक काळातील आध्यात्मिकतेच्या भूमिकेबद्दल उत्साही चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तरे घेतली.
१९९० च्या दशकात तिचा प्रवास दक्षिण अमेरिका, पूर्व युरोप, आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात पसरला.
त्यांच्यावर जगभरातील संस्था कडून अनेक सन्माननीय पुरस्कार आणि डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. 1995 मध्ये, त्यांनी बीजिंगमधील चौथ्या जागतिक महिला परिषदे मध्ये भाषण केले. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात जागतिक शांततेबद्दल देखील भाषण केले.
१९९७ मध्ये क्लेस नोबेल यांनी श्री माताजी आणि सहज योगाबद्दल आपले कौतुक व्यक्त केले, ज्याला त्यांनी "योग्य आणि अयोग्य यातील फरक ठरविण्यासाठी एक संदर्भ बिंदू" आणि "मानवतेसाठी आशेचा स्रोत" असे वर्णन केले.