एक उदात्त वारसा
शालिवाहन घराण्याचे वंशज
सन १९२३ च्या वसंत ऋतूच्या विषुवदिनाच्या, म्हणजे २१ मार्चला, बरोबर बाराच्या ठोक्याला, निर्मला साळवे यांचा जन्म भारताच्या भौगोलिक केंद्रातील मध्यभागी असलेल्या छिंदवाडा येथे झाला. निर्मलाच्या व्यक्तिमत्त्वात तिच्या पूर्वजांचे उदात्त गुण लहानपणापासूनच दिसत होते
तिची आजी, सखुबाई साळवे, कुटुंबाच्या वंशपरंपरेतून शतकानुशतके आलेले धैर्यशील आणि सद्गुणी गुण दाखवायची. १८८३ मध्ये, गर्भारपणाच्या शेवटच्या अवस्थेत असताना, सखुबाईने तिच्या पतीला दुर्दैवी परिस्थितीत गमावले. त्यांच्या नातेवाईकांनी (जे त्यांच्या ख्रिश्चन धर्माचा स्वीकार सहन करू शकत नव्हते) धमकी दिल्याने, तिने तिच्या चार मुलांना घेऊन एका पावसाळी रात्री उशिरा गाव सोडले, तेव्हा जवळच्या नदीला पूर आला होता.
सखुबाई आणि तिच्या मुलांना संपन्नता आणि ऐश्वर्याच्या जीवनातून अत्यंत काटकसरीच्या जीवनात रुपांतर करावे लागले. तथापि, तिच्या मुलांचे शिक्षण सखुबाईसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, आणि तिने त्यांच्यात त्यागाची आणि निष्ठेची भावना रुजवली. घरात रॉकेल संपल्यावर ते रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करायचे.
प्रसादराव, सर्वात लहान, हे विशेषतः हुशार विद्यार्थी होते आणि त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच शिष्यवृत्ती मिळवल्या. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि छिंदवाडा शहरातील एका प्रसिद्ध फर्ममध्ये सामील झाले. त्यांनी लवकरच विवाह केला, परंतु दुर्दैवाने, ३७ व्या वर्षी ते पाच मुलांसह विधुर झाले. जरी ते अनिच्छुक होते तरी, मुलांच्या हिताच्या काळजीपोटी आणि भल्यासाठी त्यांच्या त्याच्या नातेवाईकांनी पुन्हा लग्न करण्यास प्रवृत्त केले.
नागपूरची एक तरुणी, कॉर्नेलिया करुणा जाधव, जी भारतातील पहिली स्त्री होती जिने गणितात सन्मान पदवी प्राप्त केली होती. ती संस्कृतची विद्वान देखील होती आणि प्राचीन भारतीय संस्कृतीत पारंगत होती. ती खूपच उच्चशिक्षित असल्यामुळे, तिच्या वडिलांना तिच्या बरोबरीच्या किंवा उच्च शैक्षणिक पात्रतेच्या जोडीदाराचा शोध घेणे कठीण झाले होते.
मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रसादराव यांनी कॉर्नेलिया आणि तिच्या वडिलांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पाच मुलांसह एका विधुराचा हा प्रस्ताव स्वीकारणे हे सोपे नव्हते. तथापि, ती प्रसादराव यांच्या बुद्धिमत्तेने आणि देवावरील त्यांच्या विश्वासाने प्रभावित झाली आणि तिला त्यांच्या लहान वयात आईविना राहिलेल्या मुलांसाठी खोलवर करुणा वाटली. त्यांचे २१ जून १९२० रोजी लग्न झाले.
"माझ्या पूर्वजांनी या ठिकाणी राज्य केले आणि हे शालिवाहनांच्या राजधानीचे स्थान होते, ज्याला प्रतिष्ठान म्हणत आणि त्यांनी ते सोपे करून पैठण असे केले. ते हजारो वर्षे राज्यकर्ते होते. त्यांनी शालिवाहन वंशाची सुरुवात केली, खरं तर त्यांनी स्वत:ला सातवाहन म्हणजे सात वाहनं (वाहनं) असे म्हटले. त्यांनी सात चक्रांच्या सात वाहनांचे प्रतिनिधित्व केले. हे किती सहज आहे हे आश्चर्यकारक आहे."
प्रसादराव आणि कॉर्नेलिया यांनी त्यांच्या देशाबद्दल आणि त्याच्या महान आध्यात्मिक परंपरा आणि मूल्यांबद्दल मनापासून प्रेम बाळगले. १९२५ मध्ये जेव्हा त्यांची मुलगी निर्मला दोन वर्षांची होती, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा महात्मा गांधींजींची भेट घेतली आणि या भेटीने त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पाडला. त्यांनी गांधीजींच्या अहिंसक संघर्षाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताच्या दृष्टीकोनाला ओळखले आणि त्यात सहभागी झाले.
जरी प्रसादराव यांना ब्रिटिशांनी एक पदवी दिली होती आणि ते ख्रिश्चन होते (जे ब्रिटिश राजवटीच्या काळात अनेक विशेषाधिकार देत होते), तरीही त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने चळवळीत सामील होण्यास अजिबात संकोच केला नाही, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली – नागपूरच्या सार्वजनिक चौकात परदेशी बनावटीचे कपडे जाळून. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे, त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यांनी कुटुंबीयांना एक नियम घालून दिला की त्यांच्यासाठी कुणीही अश्रू ढाळू नये. भारताचे स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचे होते आणि त्याग हा अपवाद नव्हता, तर नियम होता.
आई-वडील अनेकदा बाहेर किंवा तुरुंगात असताना, श्री माताजींनी घरचा कारभार स्वतःवर घेतला, जेणेकरून त्यांच्या मोठ्या भावंडांना त्यांचा अभ्यास अखंडपणे चालू ठेवता येईल. त्यावेळी त्या केवळ आठ वर्षांच्या होत्या.
काही वर्षांनंतर श्री माताजीं चे स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचे वय झाले, त्यांनी सहकारी विद्यार्थ्यांनाही स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यास प्रोत्साहित केले. श्री माताजींना इंग्रजांनी अनेकवेळा तुरुंगात टाकले आणि त्यांचा छळही झाला. परंतु या अनुभवामुळे त्यांचा आत्मा कमकुवत झाला नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात, श्री माताजीं त्यांच्या उदात्त पूर्वजांच्या शाश्वत मूल्यांचे व्यक्तिमत्व करत राहील्या: धैर्य, आत्मत्याग आणि करुणा.