जगासाठी एक टाऊन हॉल
जेथे ह्रदये भेटतात
कॅक्स्टन हॉल सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये, मध्य लंडनमध्ये स्थित आहे. हे १९ व्या शतकाच्या मध्यात बांधले गेले आणि इंग्लंडमध्ये पहिली छपाई प्रेस स्थापन करणारे विलियम कॅक्स्टन यांच्या सन्मानार्थ नामांकित केले गेले, ज्याने ज्ञानाच्या उपलब्धतेत क्रांती घडवली. या ठिकाणाची नवीन आणि धाडसी कल्पनांची देवाणघेवाण आणि अन्वेषण करण्याची दीर्घ परंपरा आहे.
मूळतः कॅक्स्टन हॉल हा एक सरकारी इमारत; एक टाउन हॉल होता. तथापि, या वर्षांमध्ये याने दुहेरी भूमिका बजावली आहे. येथे नागरी समारंभ आणि सेलिब्रिटी विवाह झाले आहेत, तसेच गोंगाटपूर्ण बैठक, रॅली, याचिका, सामाजिक सुधारणा आणि राजकीय सक्रियतेसाठी आवाहनही करण्यात आले आहेत. कॅक्स्टन हॉलच्या दारांमधून २० व्या शतकातील अनेक महान कल्पना आणि चळवळी जागतिक स्तरावर पसरल्या. महिलांच्या मताधिकार चळवळीच्या, समाजवादाच्या आणि गुलामगिरीच्या परिणामांवर चर्चा करणाऱ्या पहिल्या पॅन-आफ्रिकन परिषदेच्या आवाजांनी येथे जागा मिळवली होती, ही फक्त काही उदाहरणे आहेत.
तर, हे मनोरंजक आहे की १९७७ मध्ये जेव्हा श्री माताजी निर्मला देवींनी आपला संदेश सार्वजनिक मंचावर आणण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी कॅक्स्टन हॉलची निवड केली. १९७७ ते १९८३ या काळात श्री माताजींनी येथे जवळजवळ १०० वेळा व्यासपीठावर हजेरी लावली, ज्यामुळे व्यापक जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यांचे शब्द सर्वांसाठी होते. आमंत्रण खुले होते. प्रवेश विनामूल्य होता.
महान बंगाली कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते, रवींद्रनाथ टागोर यांनी १९१३ च्या उन्हाळ्यात येथे यशस्वी व्याख्यानांची मालिका आयोजित केली होती. या व्याख्यानांची शीर्षके होती, "व्यक्तीचे विश्वाशी असलेले नाते," "आत्मा चेतना," "प्रेमातील अनुभूती," आणि "स्वत:ची समस्या." या विषयांना श्री माताजी सुमारे सत्तर वर्षांनंतर थेट संबोधित करणार होत्या. आपल्या पूर्वसुरीप्रमाणेच, त्यांनी प्राचीन पूर्वेकडील ज्ञान पश्चिमेकडील श्रोत्यांसह सामायिक करण्याची आणि त्यांना त्यांच्या आतल्या प्रवासावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली.
आपल्यामध्ये अशी जागा आहे जिथे अवकाश आणि वेळ यांचे राज्य संपते आणि जिथे उत्क्रांतीचे दुवे एकतेत/एकात्मतेत विलीन होतात.
- रवींद्रनाथ टागोर
मात्र, श्री माताजींच्या बाबतीत, त्यांच्या व्याख्यानांचा उद्देश केवळ नवीन कल्पनेचा शोध घेणे नव्हता, तर त्या कल्पनेची प्रत्यक्षता साध्य करणे हा होता. त्यांच्या व्याख्यानांसोबत नेहमीच एक अतिरिक्त फायदा असायचा. संध्याकाळच्या शेवटी, त्या नेहमी लोकांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव देत असत. गहन ध्यानाच्या स्थिरतेत त्यांना मार्गदर्शन करून, श्रोत्यांना त्यांच्या स्वतःच्या आत्म्याची अनुभूती घेण्याची संधी दिली जात असे. टागोर यांचा "ब्रह्माची अनुभूती" श्री माताजींचा "खऱ्या आत्म्याचा अनुभव" बनला होता.
पुन्हा एकदा, कॅक्स्टन हॉलच्या पायऱ्यांवरून एक क्रांतिकारी चळवळ सुरू झाली. मानवाच्या आध्यात्मिक स्तरावर उन्नत होण्याच्या क्षमतेतील एक मूलभूत पाऊल उचलले गेले आणि अनेकांनी स्वतःमध्ये एक सखोल बदल आणि त्यांच्या विश्वदृष्टीत एक बदल अनुभवला.
सहा वर्षे श्री माताजींनी कॅक्स्टन हॉलमध्ये सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधला. श्री माताजींनी त्यांच्या म्हणजे लोकांच्या सर्व चिंता आणि प्रश्नांसाठी वेळ दिला. श्री माताजींनी आजवरील अनुत्तरित अश्या सर्व प्रकारच्या मोठ्या प्रश्नांना उत्तर दिले; “आपण इथे का आहोत?”, “माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे?”, “देवाने आपल्याला का निर्माण केले?”, अगदी “देव आहे का?”. शेवटी, प्रत्येकाला त्यांच्या खऱ्या स्वत्वाशी जोडण्याचे आमंत्रण दिले गेले.
अशा प्रकारे श्री माताजींचे पश्चिमेकडील सार्वजनिक कार्य खरोखरच सुरू झाले. येथे कॅक्स्टन हॉलमध्ये, प्रत्येकाचे स्वागत होते, आणि जे सर्वात मौल्यवान होते ते विनामूल्य दिले गेले. ज्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला त्यापैकी बरेचजण त्यांच्या सोबत राहिले आणि सत्य शोधत असलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी श्री माताजींच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.
१९८० मध्ये श्री माताजी स्वतः म्हणाल्या, “सत्याचा शोध सुरू आहे आणि अनेक दुकाने उघडली आहेत (सत्याचे वचन देणारे लोक). हे दुकान नाही. हे मंदिर आहे, आणि बाजारात असलेल्या मंदिराला फारसे महत्त्व नाही. तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सात पर्वत चढावे लागले तर त्याला खूप अधिक मूल्य असेल. पण तिथे थोडकेच जण जिवंत पोहोचू शकतात. त्यामुळे, मंदिराला लंडनमध्ये, कॅक्स्टन हॉलमध्ये खाली यावे लागले, लोकांशी बोलण्यासाठी.”
श्री माताजींनी आत्मसाक्षात्काराचे आपले वरदान घेऊन प्रत्येकाचे स्वागत केले आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतले.
टागोर यांच्या शब्दात, “प्रेमाचे उच्च कार्य म्हणजे सर्व मर्यादांचे स्वागत करणे आणि त्यांना ओलांडणे”, आणि श्री माताजींचे प्रेम आणि प्रेमाचे वरदान सर्व अडथळे पार करून हृदय आणि जग उजळवते.
सत्य तेच आहे जे आहे. आपण ते बदलू शकत नाही. आपण ते रूपांतरित करू शकत नाही. आपण त्याची संकल्पना करू शकत नाही.