उन्नती

आरोहण/ उन्नती

जीवनाच्या भ्रमांवर मात करणे

आता उन्नती करण्याची वेळ आली आहे. … आणि तुम्हाला तुमच्या डोक्यातून येणारा थंड गार वारा जाणवू लागला आहे. तुम्हाला तुमच्या हातातही गार वारा जाणवतो आहे.

आत्मसाक्षात्काराचे सर्वात महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे एक परिपूर्ण संतुलन अवस्थेत पोहोचणे, जिथे आपण सतत उच्च चेतनेच्या स्तरावर चढू शकतो. सहज योग ध्यान आपल्याला आपल्या आध्यात्मिक जागरूकतेमध्ये महान उंची गाठण्यास मदत करते, ज्याचे फायदे आपले दैनंदिन जीवन, कुटुंब, काम आणि समाजात परावर्तित होतात. आपल्यासाठी आणि आपल्या पृथ्वी ग्रहासाठी एक शाश्वत जीवन स्थापन करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

आपल्या आध्यात्मिक उन्नती साठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे या क्षणभंगुर जीवनावर मात करणे, ज्याला अनेकदा मायावी जीवन म्हणतात, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वास्तव म्हणून पाहतो. प्राचीन शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे की या तात्पुरत्या अश्या क्षणिक जीवनातील आपले सर्व मानवी अनुभव, जे आपल्या चेतनेला उत्साह किंवा नैराश्य, आनंद किंवा दु:ख, नफा किंवा तोटा यांच्या द्वैतात हेलकावत ठेवतात, ते आपल्या दु:खाचे स्रोत आहेत आणि उच्च आध्यात्मिक चेतनेत शांती आणि आराम अनुभवण्यासाठी त्याग आणि ध्यानाचा मार्ग अनुसरण्याचा सल्ला देतात. यामुळेच सत्याच्या अनेक शोधकांनी जगाचा त्याग करण्याचा आणि हिमालयासारख्या दुर्गम ठिकाणी एकांतात जाऊन निर्वाण किंवा आध्यात्मिक मुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी काही उत्साही साधक आत्मसाक्षात्कारी गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन प्राप्त करतात, तरीही अनेकजण कठोर संन्याशी जीवन आणि कठोर योग-ध्यानाच्या सरावानंतरही निराश आणि रिकाम्या हाताने परत येतात.


सहज योग ध्यानासाठी कठोर संन्याशी जीवनशैली किंवा समाजातून मागे हटण्याची गरज नाही. हे गृहस्थाश्रम किंवा समाजात राहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी सर्वात सोपा मार्ग आहे. खरं तर, आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या आव्हानेच सहज योग ध्यानाच्या सरावातून प्राप्त होणाऱ्या आपल्या चढाईच्या स्थितीची चाचणी घेण्यासाठी एक आरोग्यदायी आधार प्रदान करतात.

सहज योग ध्यानाद्वारे आत्मसाक्षात्कार स्थापित करून, आपल्याला आपले खरे स्वरूप शुद्ध वैश्विक चैतन्याच्या रूपात जाणवते. या जागरूकतेसह, सहज योगाने आपल्याला दिलेल्या साधनांचा वापर करून, आपण जीवनातील हलकल्लोळाचा साक्षीदार बनू शकतो, समस्यांशी आणि अडथळ्यांशी ओळख कमी करू शकतो, आणि आपण "जीवन" म्हणून विचार करत असलेल्या बर्‍याच गोष्टी आपल्याच विचार करण्याच्या पद्धती आणि अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या असतात आणि म्हणूनच, क्षणिक असतात, हे पाहू शकतो.

उत्थान हे तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण करणे हे तुमचे काम आहे.

सहज योगाच्या खऱ्या ज्ञानाचे सर्व खजिने पूज्यनीय श्री माताजी निर्मला देवी यांनी दिलेल्या हजारो प्रवचनांमध्ये सापडू शकतात. या प्रत्येक प्रवचनामुळे आपल्याला आपल्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्यास मदत होते आणि या जागरूकतेत वाढण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळते. आम्ही आमच्या वाचकांना सार्वजनिक कार्यक्रम विभागात तसेच ग्रंथालय विभागात उपलब्ध असलेल्या विविध प्रवचनांमधून सक्रियपणे जाण्याची शिफारस करतो.

येथे आम्ही आमच्या आध्यात्मिक ध्यानस्थितीला अधिक गहन करण्यासाठी "आमचे आध्यात्मिक उत्थान " या विषयावरील एक सुंदर प्रवचन सामायिक करत आहोत.