सामूहिक ध्यान
संपूर्णाचा अविभाज्य भाग बनणे
आत्मा हा आपल्यामधील सामूहिक अस्तित्व आहे. जेव्हा ते सामूहिक अस्तित्व प्रकट होते, तेव्हा तुम्हाला स्वतःचे आश्चर्य वाटेल की तुम्ही तुमच्या बोटांच्या टोकांवर दुसऱ्या व्यक्तीच्या सूक्ष्म केंद्रांना जाणवू शकता आणि तुमच्या बोटांच्या टोकांवर तुमच्या अस्तित्वाच्या सूक्ष्म केंद्रांनाही जाणवू शकता.
श्री माताजी त्यांच्या शिकवणीत उघड करतात की आपण प्रत्यक्षात एका जिवंत आध्यात्मिक विश्वाचा (विराट) भाग आहोत, जे अवकाश, वेळ आणि पदार्थाच्या परिमाणांपलीकडे शाश्वतपणे अस्तित्वात आहे. आपल्या शरीराच्या पेशींप्रमाणेच, ज्या शरीराचा भाग असताना जतन केल्या जातात आणि इतरांपासून विभक्त झाल्यावर अस्तित्वात राहात नाहीत, तसंच आपल्या आध्यात्मिक जागरूकतेतील निरंतर वाढ सर्वात चांगल्या प्रकारे टिकून राहते जेव्हा आपण एक पूर्ण शरीराचा भाग असल्याची भावना विकसित करतो आणि एकत्रितपणे, इतरांसोबत, सामूहिकपणे ध्यान करतो.
खूप आराम आणि ऐश्वर्य असलेल्या खोल्यांची गरज नसते. ध्यान करण्यासाठीचे ठिकाण साधे असू शकते; महत्त्वाचे म्हणजे, साधे आणि शुद्ध हेतू घेऊन ध्यान करण्यासाठी येणे आणि सर्वांमध्ये वास करणार्या शाश्वत आत्म्याशी सहजतेने जोडले जाणे, जेव्हा साक्षात्कार झालेल्या सर्व आत्मसाक्षात्कारी लोकांचा समूह एकत्र ध्यान करतात तेव्हा शांत ध्यानाच्या महासागराचा आनंद घेणे शक्य होते.
श्री माताजींनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेल्या सहज योगींना सल्ला दिला की, त्यांनी एखाद्या विशिष्ट भागात राहणाऱ्या लोकांना एकत्र येऊन ध्यान करण्यासाठी सहजपणे प्रवेश करता येईल अशी काही साधी ठिकाणे शोधावीत.
१९७० पासून जगभरातील हजारो स्थानिक सहज योग ध्यान केंद्रे सहज योग साधकांद्वारे स्वेच्छेने चालवली जातात, जेणेकरून कोणत्याही सत्याच्या शोधकाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यासाठी आणि ध्यानात स्थिर होण्यासाठी मदत मिळू शकेल. श्री माताजींनी स्थापन केलेल्या आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेण्यासाठी आणि सहज योगाच्या सरावाचे ज्ञान मिळवण्यासाठी कधीही पैसे घेतले गेले नाहीत.
जगभरातील सहज योग ध्यान केंद्रे
आपले जवळचे सहज योग ध्यान केंद्र आणि ऑनलाइन ध्यान कोर्स आणि कार्यक्रम शोधण्यासाठी संवादात्मक नकाशाचा वापर करा. अधिक माहितीसाठी सहज योग वेबसाइट शोधण्यासाठी दुव्यांचा वापर करा.