ग्रंथालय

ग्रंथालय

त्यांचे शब्द

श्री माताजींनी जगाला दिलेली ठेव म्हणजे ३000 हून अधिक व्हिडिओ आणि ऑडिओ प्रवचनांचे एक मोठे ग्रंथालय आहे. ही प्रवचने अध्यात्म आणि मानवी स्थितीशी संबंधित विस्तृत विषयांचा समावेश करतात.

shri-mataji-speaking-near-rahuri-in-india-02-02-1982

एक कुशल लेखिका म्हणून, त्यांचे सर्वात लोकप्रिय कार्य, "मेटा मॉडर्न एरा," ("परा आधुनिक युग") आजच्या जगातील समस्यांचे स्पष्ट वर्णन तसेच त्यावर मात करण्यासाठी सविस्तर उपाय प्रदान करते.

श्रीमाताजींच्या दृष्टिकोन आणि अनुभवाची छाप उमटवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या भाषणांपैकी एक पाहणे किंवा ऐकणे. हे प्रवचन – लांब किंवा लहान, औपचारिक किंवा अनौपचारिक, सार्वजनिक किंवा वैयक्तिक – सर्व त्यांच्या प्रसिद्ध विनोदबुद्धी आणि शहाणपणाने दिले गेले होते. त्यांची शैली साधी आहे आणि प्रत्येक प्रवचन त्यांच्या शिकवणीच्या दोन मुख्य तत्त्वांभोवती फिरते: आत्मज्ञान आणि आपल्या अंतर्भूत आध्यात्मिक प्रकृतीचे आद्य सत्य.

सर्व काही क्षणभंगुर आहे जे शाश्वत नाही. वर्तमानकाळात, शाश्वत राहते, बाकीचे सर्व गळून पडते. हे एका वाहत्या नदीसारखे आहे जी कुठेही थांबत नाही, पण वाहणारी नदी शाश्वत आहे, बाकीच्या गोष्टी सर्व बदलत राहतात. आपण शाश्वत तत्त्वावर असल्यास, जे काही शाश्वत नाही ते बदलते आणि गळून पडते, विलीन होते आणि अस्तित्वहीन होते. आपण शाश्वततेच्या सामर्थ्याचा, दैवी प्रेमाच्या सामर्थ्याचा, आपण जे सार्वत्रिक अस्तित्व आहात त्या सामर्थ्याचा आनंद घेतला पाहिजे.

या विभागाचा शोध घ्या