निर्विचार जागरूकता
२७ मार्च १९९४, ५ जुलै १९९८ आणि १९९४ मधील आंतरराष्ट्रीय सेमिनार दरम्यान दिलेल्या सल्ल्यांचे अंश.
तुम्ही जागरूक आहात, पण तुम्ही निर्विचार आहात. तीच ती जागा आहे जिथे तुम्ही वर्तमानात असता आणि शांत असता. हीच ती अवस्था आहे जिथे तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या वाढता.
निर्विचार जागरूकता ही तुम्हाला प्राप्त करायची पहिली सुंदर अवस्था आहे. ती तुम्हाला शांती आणि साक्षीभाव देईल, ज्यामुळे तुम्ही जीवनाच्या नाटकाचा आनंद घेऊ शकता, विविध प्रकारच्या लोकांचा आनंद घेत स्वतःमध्ये वाढू शकता.
तुम्ही जे काही सुंदरतेने निर्माण केले आहे त्याचा आनंद घेतात. तुम्ही त्याबद्दल विचार करत नाही. तुम्ही प्रतिक्रिया देत नाही. प्रतिक्रिया म्हणजे तिथे आनंद आहे. किती सुंदरता आहे! तुम्ही विचार करत नाही की हे कोणी बनवले आहे, याची किंमत किती आहे – काहीच नाही. तुम्ही निर्विचार होता. आणि निर्विचार जागरूकता म्हणजे आनंदाचा असा ओघ – जो आनंद ना सुख आहे ना दु:ख, परंतु एकमेव आहे.
तुम्ही याचे वर्णन शब्दात करू शकत नाही, पण तुम्ही खरोखरच तुमच्या आत त्याला अनुभवू शकता, त्या आत्मस्वरूपाच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकता. जेव्हा तुम्ही निर्विचार होता, तेव्हा तुम्ही वास्तविकता पाहू आणि अनुभवू शकता.